Universal Rules

The foundations
of handloom care.

हातमागाच्या साड्यांसाठी काही महत्त्वाचे नियम

Before addressing specific weaves, these foundational rules apply to every curated piece in our gallery.

Cleaning स्वच्छता
We recommend professional dry cleaning only to preserve the saree. साडीचे सौंदर्य आणि पोत टिकवून ठेवण्यासाठी आम्ही फक्त 'प्रोफेशनल ड्राय क्लिनिंग' करण्याचा सल्ला देतो.
Natural Aging नैसर्गिक बदल
No guarantee for colour and zari - they may change with time and use. This is a hallmark of authentic, hand-crafted textiles. साडीचा रंग आणि जरीची कोणतीही गॅरंटी नाही, कारण वेळ आणि वापरानुसार त्यात नैसर्गिक बदल होऊ शकतात. ही अस्सल हातमागाची ओळख आहे.
Ironing इस्त्री करणे
Use a cool / low-temperature iron for silk, chiffon, organza, and cotton sarees. High heat may damage the weave. रेशीम, शिफॉन, ऑर्गनझा आणि सुती साड्यांसाठी नेहमी कमी तापमानावर इस्त्री करा. जास्त उष्णतेमुळे साडीच्या धाग्यांचे नुकसान होऊ शकते.

01 - Heirloom Silks

Yeola Paithani,
Banarasi & Kanjivaram.

पारंपरिक रेशमी साड्या (येवला पैठणी, बनारसी, कांजीवरम)

Our heavy silk and brocade sarees are crafted with intricate zari work that requires careful preservation against friction and moisture.

Storage जतन करणे
Always wrap your silk sarees in a pure cotton or unbleached muslin cloth. This allows the natural fibers to breathe and prevents the zari from oxidizing. तुमची रेशमी साडी नेहमी सुती किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवा. यामुळे साडीला हवा लागते आणि जरी काळी पडत नाही.
Folding घडी बदलणे
Change the folds of your saree every 3 to 4 months. Leaving a heavy silk saree in the same fold for years can cause permanent creases and break the zari threads. साडीची घडी दर ३ ते ४ महिन्यांनी बदलणे महत्त्वाचे आहे. एकाच घडीत साडी अनेक वर्षे ठेवल्यास साडी फाटू शकते आणि जरीचे धागे तुटू शकतात.
Airing हवा लावणे
After wearing, air the saree indoors in a shaded, dry room before storing it. Never expose a silk handloom to direct sunlight. साडी नेसल्यानंतर ती थेट कपाटात न ठेवता, घरातल्या घरात सावलीत थोडा वेळ हवेला वाळत घाला. साडीला कधीही थेट ऊन लावू नका.

02 - Delicate & Sheer Weaves

Chanderi, Chiffon
& Organza.

नाजूक आणि हलक्या साड्या (चंदेरी, शिफॉन, ऑर्गनझा)

These weaves are celebrated for their light drape and translucent beauty, making them highly susceptible to tension and heat.

Ironing इस्त्री करताना
Strictly use a cool / low-temperature iron on the reverse side. High heat will warp or burn sheer fibers. या साड्या अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे नेहमी साडीच्या मागच्या बाजूने आणि अतिशय कमी तापमानावर इस्त्री करा.
Storage कपाटात ठेवताना
Store these sarees flat. Do not hang delicate weaves on hangers - the weight of the fabric will cause it to stretch and lose its structural shape over time. या साड्या हँगरवर अडकवून ठेवू नका, कारण त्यांच्या स्वतःच्या वजनाने त्यांचा आकार बिघडू शकतो. या साड्या नेहमी सपाट ठेवाव्यात.
Handling वापरताना
Avoid using heavy safety pins that can puncture and pull the delicate warp and weft of the fabric. साडी नेसताना मोठ्या सेफ्टी पिनांचा वापर टाळा, जेणेकरून साडीचे नाजूक धागे खेचले जाणार नाहीत.

03 - Handwoven Cottons

Everyday elegance,
lasting craft.

हातमागाच्या सुती साड्या

Ironing इस्त्री करणे
While cotton is durable, always use a cool / low-temperature iron to maintain the crispness of the handloom threads without scorching them. सुती साड्यांवर इस्त्री करताना नेहमी कमी तापमानाचा वापर करा, जेणेकरून धाग्यांना इजा पोहोचणार नाही.
Cleaning स्वच्छता
We still strictly advise professional dry cleaning to maintain the original dye depth and fabric stiffness. सुती साड्यांचे मूळ कडकपण आणि रंग टिकवून ठेवण्यासाठी ड्राय क्लिनिंग करणे उत्तम.